‘ ह्या ‘ कारणावरून ६५ वर्षीय वृद्धाचा कुजलेला मृतदेह काढण्याची पोलिसांवर वेळ: महाराष्ट्राचे दुर्दैव

By | February 11, 2018

65 year old man death wife refuse to take body

आपला मुलगा खूप मोठा झाला पाहिजे अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते . त्यासाठी मुलाला चांगले शिक्षण देऊन आईवडील मोठे तर करतात मात्र चांगले शिक्षण झाले कि मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मुलांना खुणावू लागतात . शिकलेली आणि नोकरी करणारी बायको आणि आपला परिवार यात ते रमून जातात आणि आई वडिलांची अडचण वाटू लागते . याहूनही पुढे परदेशी गेले तर कायमचे गेले आणि आई वडिलांना कोणी वाली राहत नाही. असाच अनुभव मुंबईमधील अल फारूक कबाली (वय ६५ ) यांच्या मृत्युनंतर त्यांना आला . अल फारूक कबाली यांचा मृत्यू झाल्यावर तब्बल १५ दिवसांनी पोलिसांना माहिती समजली. १० वर्षांनी मुलगा भारत आला तो अंत्यसंस्कार करायलाच .

कुलाब्यातील सागरसंगीत इमारतीमधील फ्लॅट क्रमांक ३०मध्ये कबाली कुटुंब राहायचे. कबाली यांचा कापडाचा व्यवसाय होता. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक मुलगा अमेरिकेला तर दुसरा मस्कतमध्ये स्थायिक झाला. मुलगी लग्नानंतर सासरी निघून गेली. हळूहळू मुलांचा आईवडिलांशी संवाद तुटला. कुलाब्यात राहणाºया आईवडिलांचा त्यांना विसर पडला. अशातच तीन वर्षांपूर्वी पत्नीनेही घटस्फोट घेतला. त्यानंतर एकाकी पडलेल्या अल फारूक कबाली यांच्या मृत्यू झाला. मृत्यूनंतर तब्बल १५ दिवसांनी त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला अशातच पत्नीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

गेले १५ ते २० दिवस त्यांचा दरवाजा बंदच होता. गुरुवारी दुपारी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. नागरिकांनी पोलिसांना फोन केला व पोलीस आल्यावर त्यांना कबाली यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. १५ दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत पोलिसांनी सुरुवातीला त्यांच्या पत्नीला मृत्यूची बातमी दिली. मात्र घटस्फोट घेतला असल्याने त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर त्यांनी विवाहित मुलगी आणि परदेशातील मुलांशी संपर्क साधला. त्यापैकी दोघे नॉट रिचेबल होते. तर मस्कतमधील मुलगा अलामीन (३८)शी पोलिसांचा संपर्क झाला. त्याच्या चौकशीत त्याने १० वर्षांत एकदाही वडिलांशी संपर्क साधला नसल्याची माहिती समोर आली.मात्र तो आल्यावर पोलिसांनी मृतदेह त्याच्या ताब्यात दिला आणि अंत्यसंस्कार करण्यात आले.

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

सासूच्या सल्ल्याने स्वतःच्या सख्ख्या अल्पवयीन भावाला ‘ ह्या ‘ कारणावरून संपवले : महाराष्ट्रातील घटना

अश्लील चित्रफीत दाखवून मौलानाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार : महाराष्ट्रातील घटना

शासकीय कार्यालयात महिलांसमोर अश्शील चाळे करणारा समाजकल्याण विभागातील वरिष्ठ लिपिक धरला

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा