पेन्शनर पुणेकरास तब्बल १ लाख ६४ हजार रुपयाचा फेसबुक फ्रेंडचा गंडा: ‘अशी ‘ केली फसवणूक

By | December 24, 2017

60 year old pune citizen cheated by facebook friend

पुणे शहर हे आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहे .विविध प्रकारचे बोर्ड लावण्याची पद्धत असो किंवा पुण्याचे काही खास शब्द.. पण पुणेकरांचे वेगळेपण यामुळे टिकून आहे .अर्थात पुणे हे पेन्शनर लोकांचे शहर म्हणून प्रसिद्ध असले तरी आता पूर्वीचे पुणे राहीले नाही हा डायलॉग अजून देखील कित्येक ठिकाणी बोलला जातो. पुण्याच्या पेन्शनर लोकांविषयी पू. ल . देशपांडे यांनी बरेच काही सांगितले आहे, त्यामुळे इथे जास्त उल्लेख करणे योग्य वाटत नाही. मात्र अशाच एका चाणाक्ष व चतुर पेन्शनर पुणेकरास तब्बल १ लाख ६४ हजार रुपयाला गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे.

ही तक्रार नारायण पेठ इथे राहणाऱ्या जेष्ठ नागरिकाने पोलीस स्टेशनला नोंदवली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सदर जेष्ठ नागरिक हे नारायण पेठ इथे राहणारे आहेत . हे गृहस्थ इंटरनेटचा चांगला वापर करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना फेसबुकवर सुंदर परदेशी तरुणीचा फोटो असलेल्या प्रोफाइलवरून मेरीलीन रजन नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ही विनंती मान्य केली . पुढे मेरीलीनशी त्यांचे बोलणे सुरु झाले . चॅटिंग च्या मध्यनामातून हे दोघे एकमेकांच्या संपर्कात राहत होते. आपला लंडन इथे व्यवसाय असल्याचे मेरिलिन हिने यांना सांगितले होते. दिल्ली इथे कस्टम विभागाने आपला काही माल ताब्यात घेतला आहे तो मला सोडवायचा आहे असे सांगितले व मी सोडवण्यासाठी दिल्ली इथे येणार आहे.

मी माझ्या व्यवसायानिम्मित पुणे इथे येणार आहे त्यावेळी भेटूयात असे दोघांमध्ये ठरले होते. पुढे तिने तक्रारदारास मी दिल्ली इथे आलेली आहे. मात्र मला पैशाची गरज आहे असे भावनिक मदतीचे आवाहन केले . तक्रारदारांनी आपली ओळख झालीच आहे तर मदत करूयात ह्या हेतूने एक लाख ६४ हजार रुपये तिने सांगितलेल्या व्यक्तीच्या खात्यावर भरले. पैसे भरले गेल्याचे समजताच मेरिलिन नॉट रिचेबल झाली. मग तक्रार दारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे ज्यांना आपण प्रत्यक्ष भेटलेलो नाही किंवा ओळखत नाही अशा व्यक्तींना आपल्या लिस्ट मध्ये समाविष्ट करण्याआधी विचार करणे गरजेचे आहे. ही एक पद्धत झाली, मात्र कित्येकदा ब्लॅकमेल करून देखील पैसे उकळण्याचे प्रकार घडले आहेत त्यामुळे यापुढील काळात नागरिकांनी जास्त दक्ष राहण्याची गरज आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरात २३ वर्षीय तरुणीवर दारू पाजून सामूहिक बलात्कार

पुण्यात 17 वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला : चार दिवसांपासून होती बेपत्ता

कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामूहिक बलात्कार : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना

पोटासाठी पुण्यात येऊन लेकरू गमावलं : लैंगिक अत्याचार करून खून

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?