ही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

By | December 1, 2017

42 apps that steals your data from mobile alert issued by central government

साधारण एक आठवड्यापूर्वी गुगलने डाटा चोरीच्या आरोपाखाली यूसी ब्राऊजर ला बाहेरचा रस्ता दाखवला होता. चीन आणि पाकिस्तान मधून बरेचसे ऐप आपल्या मोबाईलमधून डेटा चोरी करण्यासाठीच बनवले जातात . त्यामुळे ट्रू कॉलर, यूसी ब्राऊजर, शेयर-इट, व्ही चॅट यांसारखे अनेक मोबाईल अॅप वापरण्यावर भारतीय सेनेच्या जवानांवर बंदी घालण्यात आली होती. या अॅपचा वापर करून चीनकडून भारतीय जवानांच्या मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरण्यात येते, अशी धक्कादायक माहिती समोर आल्यानं सुरक्षायंत्रणेनं हे अॅप्लिकेशन तातडीनं डिलीट करण्याचे आदेश जवानांना दिले.

आता हेरगीरी करण्यात येणाऱ्या अॅपच्या यादीत आणखी काही अॅपचा समावेश असल्याचे सुरक्षायंत्रेच्या लक्षात आले असून त्यात ४१ मोबाईल अॅप्लिकेशनचा समावेश असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं म्हटलं आहे.ही आहे यादी त्या ४१ ऐपची जे आपल्या मोबाईल मधून महत्वाचा डेटा जसे मोबाईल कॉन्टॅक्टस, फोटो, व्हीडिओ, लोकेशन आणि ब्राउजर चा डेटा चोरी करू शकतात.

 1. ट्रू कॉलर, ( स्वीडन )
 2.  यूसी ब्राऊजर (चीन )
 3.  शेयर-इट,(चीन )
 4.  व्ही चॅट( चीन )
 5.  व्हिबो (चीन )
 6.  युसी न्यूज (चीन )
 7.  ब्युटी प्लस
 8.  ब्युटी क्रॉप
 9.  न्यूज डॉग
 10. व्हिवा व्हिडिओ QU व्हिडिओ
 11.  पॅरालल स्पेस
 12.  APUS ब्राऊजर
 13. सीएम ब्राऊजर
 14.  व्हायरस क्लिनर
 15.  यु कॅम मेकअप
 16. डियु रेकॉर्डर
 17.  डियु क्लिनर
 18.  डियु बॅटरी सेव्हर
 19.  डियु प्रायव्हसी
 20.  ३६० सिक्युरीटी
 21.  एमआय कम्युनिटी
 22.  एमआय स्टोअर
 23.  एमआय व्हिडिओ कॉल
 24.  व्हॉल्ट हाईड
 25.  कॅशे क्लिअर
 26.  क्लिन मास्टर
 27. वंडर कॅमेरा
 28.  फोटो वंडर
 29.  बैदु ट्रान्सलेट (चीन )
 30.  बैदु मॅप (चीन )
 31.  इएस फाइल एक्सप्लोरर
 32. QQ न्यूज फिड
 33.  QQ प्लेअर
 34.  QQ मेल
 35. QQ म्यूजिक
 36. QQ इंटरनॅशनल
 37.  QQ सिक्युरिटी सेंटर
 38.  QQ लाँचर
 39.  वी सिंक
 40.  मेल मास्टर
 41.  सेल्फी सीटी

अर्थात याआधी देखील अशाच स्वरूपाच्या बऱ्याच तक्रारी आली होत्या मात्र, सरकारकडून अधिकृत रित्या काही सांगण्यात आले नव्हते. मात्र आता सरकारने सांगितल्यामुळे तरी किमान लोक असे ऍप् आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करणार नाहीत अशी अशा करूयात.

डेटा चोरीच्या आरोपाखाली यूसी ब्राऊजर ला दाखवला गुगलने बाहेरचा रस्ता

‘ ह्या ‘ पद्धतीने ओळखा सरकारी नोकरीसाठी आलेली फसवी जाहिरात

आणि ‘ म्हणून ‘ त्याने ट्विटरवर चक्क डोनाल्ड ट्रंप यांचे अकाउंट बंद केले

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?