पुण्यातील कोंढवा परिसरात २३ वर्षीय तरुणीवर दारू पाजून सामूहिक बलात्कार

By | December 16, 2017

23 years old girl gang raped in pune kondhwa by auto rickshaw driver & his friends

पुण्यातील कोंढवा परिसरात एका २३ वर्षीय विवाहित तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर तरुणी ही येरवडा परिसरात आपल्या भावाच्या घरी राहायला होती. मात्र रात्री भावाशी तिचे कडाक्याचे भांडण झाले व तिने परत आपल्या नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली आणि इथून पुढे अनेक दुर्दैवी घटना घडत गेल्या आणि हा प्रकार घडला.

तिने रिक्षा पकडून आपल्या नवऱ्याच्या घरी जायचा निर्णय घेतला मात्र ती रात्रीच्या वेळी बाहेर पडली आणि तिचा पती राहत होता तिकडे म्हणजे कोथरूडला जायला बाहेर पडली. त्यानंतर तिने आपल्या पतीच्या कोथरूड येथील घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षा पकडून ती कोंढव्याच्या ब्रह्मा सनिसिटी सोसायटीच्या परिसरात उतरली होती. इथून तिला दुसरी रिक्षा करावी लागणार होती मात्र तिच्याकडे फोन नव्हता म्हणून तिने तिथल्या एका बिल्डिंग च्या सुरक्षा रक्षकाकडे फोन मागितला मात्र त्याच्या फोन ला बॅटरी कमी असल्याने हा फोन होऊ शकला नाही . सुरक्षा रक्षकाने तिला रिक्षा मिळवून द्यायचा प्रयत्न केला मात्र तिथून रिक्षा मिळू शकली नाही मग ती सनश्री सोसायटीपर्यंत चालत गेली. तिथे तिला रिक्षा मिळाली आणि तिचा प्रवास सुरु झाला.

रिक्षा चालकाला तिने कोथरूड ला जायचे असे सांगितले आणि कोथरूडच्या दिशेने प्रवास सुरू झाल्यानंतर रिक्षाचालकाने महिला एकटी असल्याची खात्री करून घेतली व आपल्या एका मित्राला मार्केटयार्ड ला बोलावून घेतले. तेथून हे दोघेजण तिला घेऊन सिद्धार्थनगर येथे गेले. दरम्यान ही महिला मला सोडून द्या असे सांगत होती मात्र त्यांच्यावर आता भूत सवार झाले होते , त्यांनी तिला धाक दाखवत रिक्षामधून बाहेर पडून दिले नाही . सिद्धार्थनगर येथे आल्यावर रिक्षाचालकांच्या मित्राने तिच्यावर अत्याचार केला पुढे दुसऱ्या दिवशी देखील तिला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी तिला कॅम्प रोड परिसरात सोडायला जात असताना रिक्षाचालकाने त्याच्या आणखी एका मित्राला फोन करून बोलावून घेतले. या मित्रानेही रिक्षात महिलेचा विनयभंग केला व मग तिला सोडून दिले. ह्या धक्कादायक प्रकारामुळे कोंढवा परिसरात खळबळ उडाली असून ह्या घटनेनंतर पोलिसांनी सतीश जयपाल माने (वय २३) आणि मारुती शिंदे (वय ३१) या दोन नराधमांना अटक केली आहे तर एक जण फरार असल्याचे समजते .

ह्या घटनेनंतर पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था कितपत आहे असा प्रश्न सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही. रात्री अपरात्री महिलांना पुणे मध्ये प्रवास करावाच लागतो मात्र सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात अशी घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे .

नाशिकमध्ये मुलींची तस्करी.. बांगलादेशी तरुणीचे पोलिसांवर धक्कादायक आरोप

पुण्यात 17 वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला : चार दिवसांपासून होती बेपत्ता

कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामूहिक बलात्कार : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना

पोटासाठी पुण्यात येऊन लेकरू गमावलं : लैंगिक अत्याचार करून खून

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?