१ लीटर पाण्याची बॉटल ६५ लाख रुपयाला

By | September 22, 2017

‘जल हे जीवन आहे’ आणि ‘जल हे अमृत आहे’, अशा शब्दांत पाण्याचे महत्त्व सांगितले जाते. तहानलेल्या ला पाणी पाजावे असा प्रत्येक धर्म सांगतो.

जिथे वर्षांनुवर्षे पाऊसच पडत नाही अशा लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी पाण्याचा प्रत्येक थेंब मोत्यासारखा आणि सोन्याहूनही मौल्यवान आहे. यात इस्राएलचे उदाहरण देता येईल पण जगात काही कंपन्या अशा आहेत ज्यांनी ‘मौल्यवान’ हा शब्द जरा जास्तच सिरियसली घेतला आहे.

तुम्ही कल्पनाही करू शकत नाही त्या किंमतीने ते पाण्याची विक्री करतात. आता अशीच एक कंपनी भारतात लवकरच बॉटलबंद पाण्याची सुरुवात करणार आहे . ही अमेरिकन कंपनी चक्क ६५ लाख रुपये प्रतिलिटर या दराने भारतात पाण्याची विक्री करणार आहे.

कॅलिफोर्निया स्थित ‘बेव्हर्ली हिल्स ड्रिंक’ असं या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी पुढील वर्षी आपलं बाटली बंद पाण्याचं उत्पादन भारतात विक्रीसाठी आणणार असल्याचे ‘इंडिया टाइम्स’च म्हणणं आहे.. पूर्णपणे शुद्ध असलेलं हे पाणी कॉलिफोर्नियाच्या पर्वतातून आणलं जाणार आहे. हे पाणी ज्या बाटलीतून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे ती बाटली सुद्धा स्पेशल असणार आहे. या बाटलीचं झाकणं हे पांढऱ्या सोन्यापासून तयार करण्यात येणार आहे त्यावर एक मोठा हिरा आणि २५० छोटे काळ्या रंगाचे हिरेही असणार आहेत.

अर्थात ह्या उत्पादनाला भारतात कितीसा प्रतिसाद मिळेल याबद्दल मात्र शंका आहे. वितरण व्यवस्था कशी असेल किंवा पुढे कंपनीची काय पॉलिसि राहील हे बघणे पण मजेशीर राहणार आहे .

@@पोस्ट आवडली तर लाईक करा.. शेअर करा @@