सेनेला पोस्टरबाजी भोवली : पोलीस काय कारवाई करणार यावर लक्ष ?

By | September 26, 2017

नारायण राणेंविरोधात पोस्टर लावल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसलेंविरोधात वरळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणे समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तक्रार केली होती.नारायण राणेंचा संभाव्य भाजप प्रवेश शिवसेनेला पचनी पडेना झालाय .

शिवसेनेकडून वरळीत लावलेल्या एका पोस्टरमधून राणेंवर अत्यंत विखारी भाषेत टीका केली आहे. वरळी नाक्यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी हे पोस्टर लावलं. ज्यात नारायण राणेंबाबत अत्यंत अश्शील अशा भाषेत टीका करण्यात आली आहे.

अरविंद भोसले यांनी राणे यांच्या नव्या राजकीय वाटचालीवर व्यंगात्मक भाष्य करणारे होर्डिंग वरळी नाक्यावर लावले होते मात्र त्यात व्यंगा पेक्षा विकृती जास्त होती आणि कित्येक महिला देखील या भागातून रोज प्रवास करतात असतात .. त्यांना मान खाली घालायला लावेल असे ते पोस्टर होते .

शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत या पोस्टरच्या माध्यमातून नारायण राणेंवर कडाडून टीका केली आहे. या पोस्टरचे विकृत फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.अर्थात राणे यांनी अजून तरी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही .

काँग्रेसला रामराम ठोकून ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सोमवारी रात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते. माझ्यासोबत २५ आमदार येतील, असं आश्वासन राणेंनी शहा यांना दिल्याचे समजते मात्र त्याआधी दानवे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राणे, दानवे व पाटील यांच्यात बैठक झाली होती. त्यावरून राणेंचा भाजपा प्रवेश जवळ जवळ निश्चित मानला जात आहे.

शहा यांच्यासोबतच्या बैठकीत राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबत चर्चा झालीच नाही. राणेंनी शहा यांना केवळ सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.

?? पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा ??