साता-यात विनोद तावडेंवर बुक्का टाकण्याचा प्रयत्न.. कोण होता ‘ हा ‘ व्यक्ती ?

By | September 22, 2017

vinod tawade

सातारा- रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी साता-यात आलेल्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अंगावर एका तरूणाने बुक्का टाकण्याचा प्रयत्न केला. ‘रयत’मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी शिक्षण मंत्री साता-यात आले होते.

मारुती जानकर असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करून विनोद तावडे आणि इतर मान्यवर व्यासपीठाच्या दिशेने निघाले. त्यावेळी मारुती जानकर याने त्यांच्या दिशेने बुक्का फेकला. मल्हार क्रांती मोर्चाचा जानकर हा कार्यकर्ता असल्याची परिसरात चर्चा आहे.

‘विनोद तावडे मुर्दाबाद’ अशी घोषणा देत त्यांच्यावर बुक्का टाकण्याचा प्रयत्न या तरुणाने केला केला. यावेळी भाजपाचे नगरसेवक धनंजय जांभळे आणि विठ्ठल बलशेटवार यांनी संबंधिताला रोखले.

सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते आग्रही आहेत.

? पोस्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा ?