शेतीच्या वादातून वडील व मुलाची निर्घृण हत्या : नांदेड परिसरातील घटना

By | September 25, 2017

 

शेतीच्या वादातून नांदेड जवळील थुगाव येथे आनंदराव उमाजी भोसले आणि श्याम आनंदराव भोसले ह्या वडील व मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली तर इतर १६ जण जखमी झाले. १६ जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या सगळ्या जखमींवर नांदेडच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

नांदेडपासून काही अंतरावरच असलेल्या थुगाव या ठिकाणी शनिवारी ही घटना घडली. थुगाव शिवारातील सर्वे क्रमांक ११९ मधील शेतजमिनीवरून भोसले कुटुंबात अनेक वर्षांपासून वाद होता. २०१२ पासून हे प्रकरण न्यायालयात आहे. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी २३ सप्टेंबरच्या सकाळी साडेदहाच्या सुमाराला नामदेव भोसले, दिगंबर भोसले, आनंदा भोसले, शिवाजी भोसले असे दोन गट समोरासमोर आले.

सुरूवातीला बाचाबाची होऊन नंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले दोन्ही गटांकडून लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडचा वापर एकमेकांवर हल्ला करण्यासाठी करण्यात आला त्यात आनंदराव भोसले (वय ६५) आणि त्यांचा मुलगा श्याम भोसले(वय ३६)हे दोघे जागीच ठार झाले. तर मारोती भोसले,आनंंदा भोसले, शंकर भोसले, सूरज भोसले, प्रयागबाई भोसले, शीला भोसले, शुभम भोसले, गयाबाई भोसले, प्रकाश भोसले, बायनाबाई भोसले, मंजुळा भोसले. दिगंबर भोसले हे सगळेजण जखमी झाले. यापैकी आनंदा भोसलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

ज्या वडिल मुलाची हत्या करण्यात आली त्यांचे मृतदेह सरकारी रूग्णालयात आणण्यात आले आहेत. तरीही या सगळ्या प्रकाराबाबत तक्रार देण्यास अजून कोणीही पुढे आले नाही . पोलिसांनी ज्या रूग्णालयात जखमींना दाखल केले आहे तिथे जाऊन माहिती घेतली व गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली