शिवसेनेचे वाघ विधानसभेत मांजर बनले : आ. बच्चू कडू

By | September 28, 2017

bachhu kadu prahaar sanghtana

धर्माच्या नावाखाली राजकारण करणारे सत्तेत आहेत . विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करीत शेतकऱ्याला बेघर केल जातंय. शेतकरी प्रश्नांवर लढणाऱ्यांना गुंडाळण्याचे उद्योग सुरू आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे बँकेचे ‘एजंट’ असल्याची टीका प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी केली.

जनशक्ती प्रहार पक्षाच्या वतीने वाडिवऱ्हे (नाशिक ) येथे शेतकरी मेळावा आयोजित केला होता तेव्हा ते बोलत होते,या वेळी उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष सचिन पनमंड, गोपाळ शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

वाढती महागाई सर्वसामान्यांच्या जिव्हारी लागली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक वेठीस धरला गेला. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जाणीवपूर्वक बगल देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्यांना गुंडाळण्याचे उद्योग होत असले तरी आपण सरकारला पुरून उरू असे कडू म्हणाले. नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकले गेले. मुंबई व दिल्लीत कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने ही कारवाई जाणीवपूर्वक केल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेनेला पाकिस्तानचे खेळाडू भारतात चालत नाहीत, पण पाकिस्तानचा कांदा मात्र चालतो, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे विरोधकही भांडवल करीत आहेत. शिवसेनेचे वाघ विधानसभेत मांजर बनून आहेत . मात्र आपण शेतकऱ्यांसाठी कायम लढत राहणार आहोत. शेतकऱ्यांचे संघटन होऊनही सरकार काही बधले नाही. सरकारला वठणीवर आणण्यासाठी व न्याय मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचा कट्टरतावाद उभा करून आरपारची लढाई उभी करण्याचा इशारा त्यांनी दिला.

?पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ?

--Ads--

One thought on “शिवसेनेचे वाघ विधानसभेत मांजर बनले : आ. बच्चू कडू

  1. Pingback: आता मनसे जिल्हा अध्यक्षाने खाल्ला विदर्भात मार : ‘ हे ‘ आहे कारण – Marathi People

Leave a Reply