शिवसेनेचे राजीनामे खिशातच राहणार ..दसरा मेळाव्यात भूकंप नाही

By | September 25, 2017

shivsena

‘राजीनामे खिशातच आहेत’, ‘राजकीय भूकंप होईल’, ‘आता निर्णयाची वेळ जवळ आलीय’, असे इशारे, धमक्या शिवसेनेने भाजपला अनेक वेळा दिल्या आहेत. आताही दसरा मेळाव्यात शिवसेना पुन्हा एकदा भाजप आणि भाजपच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडून, तोंडसुख घेऊन सत्तेचा लाभ घेणेच पसंत करणार असल्याचे निकटवर्तिय सूत्रांकडून समजते.

शनिवारच्या महागाईच्या आंदोलनावरून सेने भाजप मध्ये ‘राडा’ झाल्यानंतरही शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्धास्त असून सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुख्यमंत्री ज्या वेळी दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समारंभाला असतील तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भाषण देतील.

 

३० सप्टेंबरला मुंबईतील दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेणार नाहीत याची फडणवीस यांना खात्री आहे. शिवसेनेकडून केंद्र आणि राज्याच्या अनेक निर्णयांवर टीकेची झोड सुरू आहे. महागाईच्या विरोधात हजारो शिवसैनिक शनिवारी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. त्यातून त्यांच्या मनातील मोदी द्वेष दिसून आला.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काहीतरी निर्णय होऊ शकतो अशी चर्चा होती मात्र सत्तेत राहूनच भाजपला लक्ष्य करण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. पक्ष फुटीची भीती हेच यामागचे कारण असावे असे समजते . शिवसेनेच्या मंत्र्यांनाही त्यांच्या पक्षाने सरकारमधून बाहेर पडावे असे वाटत नाही, त्याऐवजी शिवसेना जुन्या मंत्र्यांना हटवा आणि नवीन चेह-यांना संधी मिळावी म्हणून आग्रही आहे.

सामनामधून भाजपा, केंद्र व राज्य सरकारवरील तीव्र टीका यापुढेही सुरू राहील. भाजपाचे प्रवक्ते, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेनेचे आ. अनिल परब, आ. नीलम गो-हे हे एकमेकांच्या पक्षांवर सत्तेचं सोबत राहूनच सडकून टीका करीत राहतील आणि विरोधी पक्षाची जागा भरून काढतील अशी एकंदरीत चिन्हे आहेत

?? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ??