रोहिंग्यांनी केलेल्या बौद्धांच्या कत्तली प्रकाश आंबेडकर यांना दिसत नाही काय ?

By | September 27, 2017

“बौद्धधर्मीय म्यानमार सरकारने रोहिंग्या मुसलमानांविरुद्ध चालू केलेल्या लष्करी कारवाईने भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अस्वस्थ वाटते; पण याच रोहिंग्यांनी आतापर्यंत केलेल्या बौद्धांच्या कत्तली दिसत नाहीत काय ? आणि बौद्धांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या बोधगयात रोहिंग्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटाने आंबेडकरांना का अस्वस्थ वाटले नव्हते?”, असा सवाल भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी मंगळवारी केली.

मानवतावादी दृष्टिकोनातून रोहिंग्यांना भारताने आश्रय देण्याची मागणी प्रकाश आंबेडकर आंबेडकरांनी नुकतीच केली होती मात्र म्यानमारमध्ये बौद्धांच्याच कत्तली होत असताना आंबेडकरांनी कधी आवाज उठविला नाही. रोहिंग्यांच्या समर्थनासाठी रझा अकादमीने मुंबईत काढलेल्या मोर्चामध्ये थेट पोलिसांवरच हल्लाबोल केला, तेव्हा आंबेडकर शांत राहिले आहेत, असेही ते म्हणाले.

रोहिंग्यांची मनमानी करून झाल्यावर शेवटी बौद्धांचा संयम संपल्यानंतर मग मात्र आंबेडकरांना रोहिंग्यांची दया येते. त्यांनी किमान देशाची सुरक्षितता तरी लक्षात घ्यायला पाहिजे,” असे अमर साबळे पुढे म्हणाले.

सबका साथ, सबका विकास असे सांगत नरेंद्र मोदी अल्पसंख्यकांच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत. पण जगाने नाकारलेल्या आणि त्यांच्या अवगुणांमुळे धिक्कारलेल्या रोहिंग्यांना भारतीय मुस्लिमांच्या तोंडातील घास देण्याचा हा प्रकार आहे,” अशी टीका करून ते म्हणाले, त्यांची भलामण करण्याऐवजी त्यांनी भारतातील दलित आणि मुस्लिमांच्या कल्याणाचा विचार केल्यास बरे होईल.”

@@पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा @@