…म्हणून या दोघांनी रेल्वे रुळावर केली आत्महत्या

By | September 28, 2017

kalyan sucide

काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे रुळावर एका मुलीचा आणि एका मुलाचा मृतदेह आढळला होता. त्यांनी आत्महत्या का केली याचे गूढ आता उकलले आहे.

काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे रुळावर एका मुलीचा आणि एका मुलाचा मृतदेह आढळला होता. त्यांनी आत्महत्या का केली याचे गूढ उकलले आहे. आत्महत्या केलेल्या मुलीने वसतिगृहातील तिच्याबरोबर राहणा-या दोन मुलींचे नग्न छायाचित्र काढून प्रियकराला पाठवले होते. ही बाब त्या मुलींना समजली मग पुढे पोलिसी कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले.

सुरेश शिंदे आणि वृषाली लांडे अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. सुरेश हा एका खाजगी दवाखान्यात काम करत होता तर वृषाली सेंट जॉर्ज रुग्णालयात नर्सिंगचे शिक्षण घेत होती.

अर्थात असे हे फोटो काढण्यासाठी तिला सुरेश सांगितले होते. सुरेशच्या सांगण्यावरून वृषालीने तिच्यासोबत राहणा-या दोन मैत्रिणींचे नग्न फोटो काढून सुरेशला पाठवले. या दोन पिडीत मुलींच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी वृषालीला जाब विचारला. सुरेशच्या सांगण्यावरून आपण असे केले असल्याचे वृषालीने कबुल केले. संबंधित तरुणींनी तिला कबूली लिखित स्वरुपात मागितली आणि सुरेशसोबत संबंध तोडून टाक असे सुनावले .

दोन दिवसानंतर वृषाली आणि सुरेश यांच्यात पुन्हा संभाषण सुरु झाले . मग ह्या दोन पिडीत तरुणींनी याबाबत पोलीसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. मग वृषाली वसतिगृहाच्या बाहेर पडली व परत आलीच नाही . पुढे संपर्क होत नसल्याने वसतिगृह अधिका-यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

तपासादरम्यान पोलिसांना वृषालीने आत्महत्येपूर्वी लिहीलेली चिठ्ठी मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात वृषाली आणि सुरेश यांचे कृत्य उलगडत गेले