मुलांचे उद्योग नीट चालावेत म्हणून राणे भाजप मध्ये : ‘ यांनी ‘ केला थेट आरोप

By | September 24, 2017

narayan rane bjp

नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश मागील ७ ते ८ महिन्यांपासून निश्चित झाला आहे. त्यामुळे कालच्या घोषणेत नावीन्य काहीच नाही. मुलांचे राजकीय भवितव्य आणि उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालवावेत म्हणून राणे सत्ताधारी भाजपात जात आहेत. त्यांना सिंधुदुर्गातील कार्यकर्ते व विकासाचे काही एक देणे घेणे नाही असे आमदार वैभव नाईक म्हणाले. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.

रेडी पोर्ट जॉन अनॅस कंपनीला दिले होते. त्या कंपनीचा दोनशे कोटीचा फायदा झाला पण पोर्ट विकसित झाले नाही म्हणून मी आवाज उठविला. सरकारने रेडी पोर्ट ताब्यात घेतले. त्याविरोधात कंपनी मुंबई उच्च न्यायालयात गेली, आता हाच खटला सरकारने परत मागे घेण्याचे सरकारी वकिलांना पत्र दिले आहे. म्हणजेच नारायण राणे यांचा प्रवेश झाल्यावर तसे करण्यात येईल. राणेंचा प्रवेश निश्चित झाल्याचे आ. नाईक म्हणाले.

शिवसेना रिकामी करण्याची राणे यांची कॅपॅसिटी नाही . काँग्रेसमध्ये १२ वर्षे राहून काँग्रेसला धक्का दिला तेच भाजपात प्रवेश केल्यावर चित्र दिसेल. शिवसेनेतून त्यांच्या सोबत गेलेले सगळे आमदार आता माजी आमदार झाले आहेत. त्यांच्या सोबत आता कोणीच नाहीत त्यामुळे ते सर्व इतिहासजमा झाले आहेत. राणेंच्या कंपनीतील सिंधुदुर्गातील सदस्यच आता फक्त त्यांच्या सोबत जातील असे आ. वैभव नाईक म्हणाले.

वैभव नाईक पुढे म्हणाले , खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर व मी ठेकेदारांकडे हप्ते मागत असल्याचे राणे अ‍ॅफिडेव्हिट करणार आहेत पण राणे यांच्या पुत्राने हप्ते मागितले म्हणून आधीच गुन्हा दाखल आहे.

माजी खासदार नीलेश राणे यांच्या आणखी दोन जरी मुलाखती कालच्या सारख्या झाल्या तर त्यांचे डिपॉझिट देखील राहणार नाही असे आ. नाईक म्हणाले.