पुणे जिल्ह्यातील जनतेमधून निवड झालेल्या ‘ ह्या ‘ आहेत पहिल्या महिला सरपंच

By | September 27, 2017

जो गावाशी वागेन नीट त्यालाच मिळणार सरपंचाची सीट या उक्तीनुसार जुलै महिन्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट जनतेमधून सरपंच निवडण्याचा निर्णय झाला होता.

जनतेमधून थेट सरपंच निवड प्रक्रियेतून जिल्ह्यातील पहिल्या सरपंच होण्याचा मान मुळशीतील बावधन गावच्या पियुषा किरण दगडे यांना मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक किरण दगडे यांच्या त्या पत्नी आहेत.

सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली. आतापर्यंत ग्राम पंचायतीत निवडून आलेल्या सदस्यांकडे सरपंचाची निवड करण्याचा अधिकार होता. यात ज्या पॅनलकडे बहुमत असायचे त्यांची भूमिका निर्णायक ठरायची मात्र नव्या निर्णयामुळे सरपंच निवडण्याचे सर्वाधिकार जनतेला मिळाले आहेत.आणि पॅनल च्या बहुमताला तितकीशी किंमत उरलेली नाही.

ग्रामीण भागात या निर्णयाबद्दल प्रत्येकाचे आपले विचार आहेत. सरपंचाची निवड थेट जनतेतून करणे योग्य आहे; मात्र त्यापूर्वी ग्रामीण भागातील मानसिकतेत सामाजिक न्यायाची भावना रुजविणे आवश्यक आहे असे काहीजणांचे मत आहे.

?? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ??