नाशिकचे ‘ हे ‘ व्यावसायिक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर

By | September 22, 2017

रोखीत व्यवहार करून त्याच्या नोंदी न ठेवणारे बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर, कोचिंग क्लासेस आदी घटक प्राप्तीकर विभागाच्या रडारवर असून संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे चिन्हे आहेत.

देशात हळूहळू प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्राप्तिकर संकलनाद्वारे सरकारला उत्पन्न मिळवून देण्यात देशात उर्वरित महाराष्ट्र विभाग हा द्वितीयस्थानी आहे.नाशिक विभागात कर संकलन चांगले असले तरी परतावा द्यावा लागण्याचे प्रमाणही अधिक आहे

प्राप्तिकर विभागाने विवारण पत्र व कर भरण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ केली आहे. केवळ आठ ते दहा मुद्यांची माहिती देऊन ही प्रक्रिया पार पाडता येते. ऑनलाईन अर्ज भरण्यास वा तत्सम अडचणी असल्यास अशा नागरिकांना प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विवरण पत्र व कर न भरल्यास कारवाई होऊ शकते

अनेक घटकांकडून रेग्युलर उत्पन्न शेती व्यवसायातील दाखवून कर चुकविला जातो. या संदर्भात त्यांनी अशा बनावट शेतकऱ्यांवर प्राप्तिकर विभागाची नजर आहे . अनेकांचे उत्पन्नाचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. काही दिवसांपूर्वी प्राप्तीकर विभागाने जिल्ह्यातील सात बडय़ा कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकले होते.

आणि आताही संशयास्पद वाटणाऱ्या खातेधारकांना प्राप्तिकर विभागाने ऑनलाईन नोटीस बजावल्या आहेत

🙂 पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा 🙂