नारायण राणे भाजपमध्ये न जाता घेऊ शकतात ‘ हा ‘ मोठा निर्णय

By | September 28, 2017

narayan rane bjp

नारायण राणे यांनी अमित शहा यांची भेट घेतली असली तरी त्या भेटीतून राणे यांनी काही ठोस निर्णय घ्यावा इथपर्यंत चर्चा झाली नाही. घटस्थापनेला काँग्रेस सोडल्यानंतर राणे काय निर्णय घेणार,याकडे बऱ्याच राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे. राणे भाजप मध्ये न जाता आपल्या नव्या पक्षाची घोषणा १ ऑक्टोबरला करू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे .

1 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढील वाटचालीबाबत ते माहिती देणार आहेत. भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतरही नारायण राणे नेमकी काय भूमिका हे अद्याप कोणालाही समजले नाही . याबाबतच आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी नारायण राणे 1 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे.

दसऱ्यापर्यंत आपण आपली पुढची वाटचाल स्पष्ट करू, असं राणे कुडाळमधील पत्रकार परिषदेत बोलले होते. कर्तृत्व असणा-याला काँग्रेस साथ देत नाही. त्यामुळे काँग्रेसला भविष्य नाही, अशी टीका करत 21 सप्टेंबरला घटस्थापनेदिवशी पुढील निर्णय जाहीर करू, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली होती. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका समर्थ विकास पॅनेलच्या माध्यमातून लढवणार असेही ते बोलले होते .

पुढे राणेंनी दिल्लीत जाऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेटही घेतली होती. पण या भेटीत राणेंच्या भाजपा प्रवेशावर फार काही चर्चा झाली नाही. त्यामुळे आता आगामी पत्रकार परिषदेत राणे कोणते पत्ते उघड करणार, हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.

राणे यांनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. राणे यांचा तूर्त भाजपाप्रवेश होणार नाही. दिवाळीपर्यंत ते ‘बाहेर’ राहून काँग्रेसमधून कोण-कोण सोबत येतात, याचा अंदाज बांधून मगच पुढील भूमिका घेतील असा राजकीय सूत्रांचा अंदाज आहे. राज्यातील ३१ जिल्हे माझ्या पाठीशी असल्याचा दावाही राणे यांनी केला होता.

?पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ?