अखेर नारायण राणे यांनी काँग्रेस सोडली.. काँग्रेस सोडण्याची ‘ ही ‘ दिली कारणे

By | September 21, 2017

गेल्या अनेक महिन्यांपासून नारायण राणे काय करणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. ते लवकरच कॉंग्रेसपक्षातून बाहेर पडणार असल्याचं बोललं जात होतं.

आज अखेर कुडाळमध्ये त्यांनी कॉंग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही माझी हकालपट्टी काय करणार, मीच काँग्रेस सोडतो असे सांगत नारायण राणे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. माझी ताकद काय आहे हे आता तुम्हाला दाखवून देतो.मी उद्यापासून राज्याचा दौरा करणार आहे. इतर कोणत्या पक्षात जायचे कि नाही याचा नवरात्रीनंतर निर्णय घेऊ असे राणेंनी म्हटले आहे.

कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीसह सर्वच ज्येष्ठ नेत्यांवर जोरदार तोफ डागली. दोन वाजता सोनिया गांधींना पत्र पाठवलं आणि 2 वाजून 35 मिनिटांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला असं राणे म्हणाले.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा बट्याबोळ केला असा आरोप करत नारायण राणे यांनी सोमवारी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. मी नाराज असल्याच्या बातम्या येत असतानाही काँग्रेसचा एकही नेता माझ्याशी बोलला नाही. जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करताना कोणीच विचारलं नाही. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय नियमबाह्य असल्याचे राणेंनी म्हटले होते.आजच्या नारायण राणेंच्या भाषणातील मुद्दे –

 1.  तुम्ही काय मला काढणार मीच कॉंग्रेस सोडतो
 2. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून पुढील निर्णय घेणार
 3. 12 वर्षे काँग्रेसनं माझा उपयोग करुन घेतला
 4. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून अनेक जण काँग्रेस सोडतील
 5. शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष रिकामे करणार
 6. अहमद पटेल म्हणाले, सहा महिने द्या मुख्यमंत्री करु
 7. 26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, 27 तारखेला मुंबईत महसूल मंत्री म्हणून फिरलो
 8. विलासराव देशमुखांविरुद्ध मॅडमला जे सांगायला सांगितलं ते बोललो. अहमद पटेल म्हणाले थोड्या दिवसात शपथविधी होईल, पण झाला नाही
 9.  मला मँडमनं दोनदा सांगितलं की, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देणार
 10. तीन वेळा मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन, वर्ष गेलं पण पद मिळालं नाही,
 11. मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन काँग्रेसनं पाळलं नाही : राणे
 12. महसूल मंत्रिपद काढून उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो
 13. 4 वेळा मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिली : राणे

@@पोस्ट आवडली तर लाईक करा ..शेअर करा @@