नारायण राणेंविरोधात अश्लील पोस्टर लावणारा हाच का महाराजांचे नाव घेणारा पक्ष ?

By | September 25, 2017

नारायण राणे यांनी शिवसेना सोडून बरीच वर्षे झाली असलॆ तर शिवसेनेचा राणे यांच्यावरील राग शांत झालेला नाहीये. नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत, आता इथेही शिवसेनेला नारायण राणेंची ही भूमिका काही पसंत पडलेली नाही.

कोणत्या पक्षात जावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार असून आपण त्यात लुडबुड करू नये हे मान्य करेल तर ती शिवसेना कसली . जोवर पक्षात आहेत तोवर मावळे आणि पक्ष सोडला का कावळे हेच शिवसेनेचं धोरणच असल्याचे स्पष्ट होतेय. नारायण राणेंच्या विरोधात शिवसेनेने मुंबईतील वरळी भागात एक बॅनर लावला आहे. या बॅनरमध्ये नारायण राणेंवर अत्यंत खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे.इतक्या खालच्या भाषेतील अश्लील टीका आणि अत्यंत अश्लील असे चित्र काढून राणेंच्या विषयी खूप वाईट वाईट लिहलेलं आहे . जे फेसबुकवर काय कुठेच शेअर करायच्या लायकीचे नाहीये . महिला तर पाहूही शकणार नाहीत इतके असभ्य असे हे पोस्टर आहे .

‘इच्छा माझी पुरी करा’ या शीर्षकाखाली नारायण राणे यांच्या विरोधातील पोस्टर लावण्यात आले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांचे त्यावर नाव आहे . राणेंविरोधात लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये भाषेची सगळी पातळी सोडण्यात आली आहे. या पोस्टरचे फोटो सध्याच्या घडीला सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.अर्थात इतके घाण पोस्टर लावले, मोदींच्या मयताच्या घोषणा दिल्यावर हाच का तो शिवाजी महाराजांचे नाव घेणारा पक्ष असा प्रश्न उपस्थित राहतो .

नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला त्यावेळीही सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून सुद्धा नारायण राणेंवर अत्यंत वाईट पद्धतीने टीका करण्यात आली होती. मात्र वरळीत लावण्यात आलेले पोस्टर हे राजकीय व्यंगचित्र म्हणता येणार नाही उलट यातून शिवसेनेला राणे यांचे, सेनेला सोडणे अजूनही झोंबत आहे हेच दिसते. नारायण राणेंनी भाजप प्रवेश केलाच तर हा पोस्टर वाद आणखी चिघळण्याचीही शक्यता आहे

इतक्या खालच्या पातळीवर जाऊन एखाद्या नेत्यावर टीका करण्याची ही कोणती शिवसेनेची संस्कृती हाही प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत .राणे भाजप मध्ये आले तर शिवसेनेला फैलावर घेतल्याशिवाय राहणार नाही या भीतीनेच राणेंना शिवसेनेकडून टार्गेट केलं जातंय असहि काही जणांचं मत आहे .

@@ पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा @@