…धमकी देणाऱ्याने माझा इतिहास तपासावा : तुकाराम मुंढे

By | September 28, 2017

tukaram mudhe pune

धमकी देणाऱ्याने सर्वप्रथम माझा इतिहास तपासावा, असे सांगत पीएमपीएमएलचे व्यस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी कोणताही निर्णय बदलणार नाही असे ठणकावून सांगितले .मुंढे यांना काल पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली होती. . मुंढे यांनी पीएमपीएमएल कारभाराचा सद्य स्थितीचा आढावा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही गोष्ट बोलवून दाखवली.

धमकी पत्राबद्दल अधिक बोलताना मुंढे म्हणाले की, आतापर्यंतचे हे चौथे धमकी पत्र असून सर्व पत्रे एकाच व्यक्तीची असल्याचे लिखाणामधून दिसत आहे. या सर्व पत्राकडे भीतीने नव्हे तर गांभीर्याने पाहत असून राज्य शासनाने पोलीस सुरक्षा दिल्याचे त्यांनी सांगितले.

पीएमपीएमएलचे उत्पन्न वाढले आहे तसेच प्रवासी संख्येत वाढ झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली. ८ लाख असणारी प्रवासी संख्या सध्या जवळपास ११ लाखांच्या घरात पोहोचली असल्याचे ते म्हणाले. महिनाभरात मुंढे यांना दुसऱ्यांदा धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांच्या पासच्या दरात वाढ करण्यात आल्यामुळे मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या निनावी पत्र प्रकरणात मुंढे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

@@पोस्ट आवडली तर लाइक करा .. शेअर करा @@