जेव्हा आयकर अधिकाऱ्याच्या घरातूनच ५ लाखाचा माल लंपास होतो

By | September 26, 2017

amravati news theif

इनकम टॅक्स चुकवला म्हणून हाथ धुवून मागे लागणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकऱ्याच्याच घरी चोरी झाल्याचा प्रकार घडलाय अमरावती येथे.

नागपूर विभागात कार्यरत असलेल्या आयकर अधिकाऱ्याच्या पॅराडाइस कॉलनीतील घरी चोरटयांनी हाथ साफ केल्याची घटना रविवारी रात्री घडली . चोरटयांनी एकूण ५ लाख १८ हजार रुपयांचा माल लंपास केला आहे .

आयकर अधिकारी आलम हुसेन मोहम्मद सादिक हे नागपूर विभागात कार्यरत आहेत . रविवारी रात्री ७ च्या सुमारास घराला कुलूप लावून ते कुटुंबियांसोबत कॅम्प रोडवर खरेदीसाठी गेले होते, तेथून रात्री साडे नऊ च्या सुमाराला ते घरी परतले असता त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले व त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले .

गाडगेनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे . श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरु केला आहे . शहरात काही ठिकाणी नाकाबंदी करून शोध सुरु असल्याचे पोलिसांतर्फे सांगितलं जातंय .

?? पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा ??