कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात ‘ हा ‘ दहशतवादी :पाकिस्तानचा खळबळजनक दावा

By | September 28, 2017

kulbhushan yadav

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात पाकिस्तान ला हवा असलेला एक अतिरेकी पाकिस्तान च्या ताब्यात सोपवण्याचा प्रस्ताव भारताने आपल्याला दिला होता . असे पाकिस्तान चे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद असिफ यांनी केला आहे .

२०१४ मध्ये पेशावरमध्ये शाळेवर हल्ला घडवणारा हा अतिरेकी आहे आणि हा सध्या अफगाणिस्तानच्या ताब्यात आहे . हा दहशतवादी सोपवण्याचा प्रस्ताव मिळाला होता, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद असिफ यांनी केला आहे.

२०१४ मध्ये पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर हल्ला झाला होता . हल्ला करून मुलांची क्रूर हत्या करणारा दहशतवादी अफगाणिस्तानच्या ताब्यात आहे. त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात दहशतवादी देण्यासंबंधी प्रस्ताव ठेवला होता, असा दावा असिफ यांनी ‘एशिया सोसायटी’मध्ये केला आहे.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने हेरगिरीचा आरोप आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांना किमान राजनैतिक मदत तरी देण्यात यावी , अशी भारताने अनेकदा मागणी केली होती. मात्र पाकिस्तानने ती मागणी मान्य केलेली नाही . पुढे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १८ मे रोजी या प्रकरणावर सुनावणी करताना जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

?पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ?