काय करू राव .. मार्केट थंड आहे

By | October 7, 2017

वस्त्रोद्योग असो व बँकिंग व आय टी .सर्वच क्षेत्रांना मंदीने ग्रासले असून, नोकर कपातीमुळे लोक मोठय़ा प्रमाणात बेरोजगार होत आहेत. नवीन रोजगार निर्मितीही ठप्प झाली आहे.

वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कापड उद्योगात गेल्या तीन वित्त वर्षात ६७ कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे १७६०० कामगार बेरोजगार झाले आहेत . भांडवली वस्तू बनविणारी मोठी कंपनी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने ३१ मार्चला संपलेल्या वित्त वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत तब्बल १४ हजार कर्मचा-यांना काढून टाकले.एचडीएफसी बँकेची कर्मचारी संख्या ६,०९६ ने कमी झाली आहे. इतर बँकांनीही कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली आहे.

खासगी गुंतवणूक, खासगी उपभोग आणि निर्यात यांचे प्रमाण घटल्यामुळे अर्थव्यवस्था मंदीत आली आहे. लोकांचे पैसे खर्च करण्याचे प्रमाण देखील झपाट्याने कमी होत आहेत . वस्त्रोद्योगातील निर्यात मोठ्या प्रमाणात घसरली आहे. नोटाबंदी आणि जीएसटी कमी वेळामध्ये दोन्हीही मोठे बदल झाल्यामुळे , त्याचाफटका छोटय़ा व्यवसायांना बसला आहे. २०१६ मध्ये २१२ स्टार्टअप कंपन्या बंद पडल्या. बंद पडलेले बहुतांश उद्योग पॉवरलूम क्षेत्रातील आहेत. विकेंद्रित क्षेत्रातील आकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा आकडा कित्येक पटीत आणखी मोठा असू शकतो.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?