एक कथा पेपर टाकून तीन मुलींची लग्न लावून देणाऱ्या माऊलीची

By | September 26, 2017

जिद्द असेल तर कोणत्याची संकटावर सहजपणे मात कशी केली जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे उंब्रज (ता. कराड, जिल्हा सातारा ) येथील ६५ वर्षीय प्रभावती बाळकृष्ण राक्षे. प्रभावती बाळकृष्ण राक्षे या गेली कित्येक वर्षे पेपर विक्रीचे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवत आहेत. यातून मिळणाºया तुटपुंज्या पैशातूनच त्यांनी आपल्या तिन्ही मुलींची लग्न लावून देण्याची जबाबदारी पार पाडली आहे. या उद्योगातून झालेल्या ओळखीमुळे आज त्या सध्या पेरले ग्रामपंचायतीचे सदस्य पदही भूषवित आहेत.

आयुष्याचा प्रवास हा अनेक चढ-उतारांचा असतो. मात्र प्रत्येक संकटाला सामोरे गेले की त्यावर मात करता येते, हे प्रभावती राक्षे यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांची ८ गुंठे जमीन आहे. मात्र न्यायालयीन वादात अडकल्याने पडून आहे. कष्ट केले तरच चूल पेटणार अशी त्यांची परिस्थिती. अपघातात एक मुलगा गेला. दुसरा मुलगा लग्न करून स्वत:च्या संसारात गुंतलेला आहे. मात्र प्रभावती राक्षे या खचल्या नाहीत. पेपर विक्री करून संसाराचा गाडा पुढे नेला. तिन्ही मुलींची लग्न त्यांनी पार पाडली.

पतीचा अपघात झाल्यानंतर त्यांनी नातवाला बरोबर घेऊन पेपर विक्री बंद पडू दिली नाही. ऊन वादळ पाऊस याची पर्वा न करता काम करत राहिल्या . पेपराची पिशवी भरून आजही त्या पेरले गावातील दीडशे घरांत नित्यनेमाने पेपर टाकण्याचे काम करीत आहेत.दैनिकांचे वृत्त संपादन करणे, संपादित करणे, प्रिंटींग करणे, वितरित करणे या सर्व प्रक्रियांमध्ये कित्येक हात राबत असतात.मात्र सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे पेपर घरपोच करणे. पेपर घरपोच करणारे बहुतांशी ठिकाणी पुरुषच असतात. पण पेरले येथील ६५ वर्षीय प्रभावती बाळकृष्ण राक्षे या गेली कित्येक वर्षे पेपर विक्रीचे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवित आहेत. अर्थात ह्या कामात त्यांच्या पतीचाही मोलाचा सहभाग असतो.

प्रभावती राक्षे पेपर विक्री झाल्यावर काही घरांत धुण्या-भांड्याची कामेही करतात. यानंतर स्वतःची म्हैस चरायला घेऊन जातात. यात त्याचा दिवस जातो. रिकामा वेळ मिळाला तर कोणाच्या घरी जाऊन गप्पा मारत बसणे, हे त्यांना मान्य नाही. याच स्वभावामुळे आणि लोकांमध्ये मिसळून राहिल्यामुळे त्यांना पेरले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे करण्यात आले आणि त्या सहजपणे निवडूनही आल्या. शक्य होईल तेवढे प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या प्रयत्न करीत आहेत. अशा या आधुनिक नवदुर्गाने आपल्या कष्टामुळे व स्वभावामुळे पेरलेकरांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सलाम ह्या माउलीला आणि तिच्या जिद्दीला ( मूळ पोस्ट : लोकमत )

@@पोस्ट आवडली असेल तर लाईक करा .. शेअर करा @@