उद्यापासून तीन दिवस बँका बंद.. बँकांमध्ये होणार तोबा गर्दी

By | September 29, 2017

banks closed

उद्यापासून सलग तीन दिवस देशातील सर्व प्रमुख बँका बंद राहणार आहेत.त्यामुळे आजच आपली सर्व बँकेची कामे आटोपून घ्यावी लागणार आहेत .

उद्या चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असते तर रविवारी साप्ताहिक सुट्टी आणि सोमवारी महात्मा गांधी जयंती आल्यामुळे सर्वच बँका बंद राहणार आहेत . आता पुढील तीन दिवस पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावे लागणार आहे. शिवाय सुट्ट्यांमुळे एटीएमचे पैसे संपल्यावर तिथून पण खाली हाथ परत येण्याची शक्यता आहे .

दरम्यान, सण सुद असल्यामुळे खरेदी करणेसाठी एटीएममधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढली जाते. त्यामुळे एटीएम कोरडी पडू नयेत यासाठी बॅंका पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध करून देणार असल्याचे समजते. तसेच, लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी बँकानी एटीएममधून पुरेशी रक्कम भरण्याची देखील माहिती आहे .

मात्र याआधीही असे झालेले असताना एटीएममधून पैसे काढण्यास अनंत अडचणी आल्या आहेत त्यामुळे बँकाच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा, म्हणून आजचा आपली बँकेतले कामे उरकून घेण्याचा दबाव प्रत्येकवर राहणार आहे परिणामी बँकेत देखील गर्दी राहणार आहे . या वर्षात अनेक वेळा सलग बँका बंद राहतील अशा बऱ्याच सुट्ट्या येत आहेत.

यामुळे बँकेशी संबंधित कामे होण्यास विलंब होतो. मात्र ऑनलाइन व्यवहार केल्याने ही अडचण निर्माण होत नाही. त्यामुळे बहुसंख्य व्यवहार ऑनलाइन अथवा डिजिटल माध्यमातून करण्याचे आवाहन बँकांतर्फे करण्यात येत आहे.

@ पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा @@