आणि ‘म्हणून ‘ दाऊद भारतात फोन करत नाही : इकबाल कासकर

By | September 22, 2017

dawood ibrahim

खंडणी प्रकरणी अटकेत असलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीदरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

खंडणी प्रकरणी अटक केलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीदरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती सांगितली आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असून त्याचा फोन टॅप होईल या भीतीने दाऊदने गेल्या तीन वर्षांपासून भारतात फोन केलेला नाही, असे इक्बाल म्हणतो.

बिल्डरांकडून खंडणी उकळल्याच्या तक्रारीवरून इक्बाल कासकरला तीन साथीदारांसह भायखळा येथून अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे . मात्र अनेक प्रश्नांना इकबाल नकारात्मक उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांनी त्याला प्रश्न विचारून महत्त्वाची माहिती मिळवली. दाऊद पाकिस्तानात असून तो कराचीत आहे. दाऊदचे लॅटिन अमेरिकेतील ड्रग माफियांशी कनेक्शन आहे. तसेच दाऊदच्या चार ते पाच ठिकाणांची माहिती इक्बालने चौकशीदरम्यान दिली.

दाऊदशी संपर्क होतो का, असे विचारले असता ‘गेल्या तीन वर्षात दाऊदने कधीही आपले कुटुंबीय वा एजंटना फोन केलेला नाही. आपला फोन टॅप होईल अशी भीती त्याला आहे,’ असे इक्बालने सांगितले. ठाण्यातील खंडणी वसुली प्रकरणात दाऊदचा काहीही संबंध नाही, असा दावा इक्बालने केला आहे.मात्र इकबाल स्काईप च्या माध्यमातून दाऊदपर्यंत संपर्क व खंडणीचे अपडेट पोहचवत करत होता असे पोलिसांचे म्हणणे आहे.

? पोस्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा ?