आणि भारतीय लष्कराने परत एकदा सर्जिकल स्ट्राईक केला : सविस्तर बातमी

By | September 27, 2017

indian army surgical strike myanmar

पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असताना भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक केला आहे. भारत हा केवळ सहन करणाऱ्यांचा देश नाही हे भारताने दाखवून दिल आहे . यामध्ये अनेक दहशतवादी संपवले असल्याची बातमी आहे.

पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक केलं आहे मात्र ह्यावेळी पाकिस्तान नव्हे तर शेजारच्या म्यानमारमध्ये शिरून नागा दहशतवाद्यांच्या कॅंम्पवर कारवाई करण्यात आली मात्र नेमके किती दहशतवादी ठार केले गेले याची आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही.

अर्थात लष्कराने सर्जिकल स्ट्राइक या शब्दाचा वापर केलेला नाही पण भारत-म्यानमार सीमेवर अशाप्रकारची कारवाई करण्यात आल्याच्या बातमीस दुजोरा दिला आहे.

आज सकाळी इंडो-म्यानमार सीमेजवळील लांग्खू गावाजवळ पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी भारतीय लष्कराने ही कारवाई केली. यामध्ये भारतीय लष्कराचं कोणतंही नुकसान झालेलं नाही . या कारवाईमध्ये नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग)या प्रतिबंधित संघटनेचे अनेक दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती आहे तर दहशतवादी संघटनेचे अनेक कॅम्प उद्ध्वस्त करून सैनिक परत मायभूमीत रवाना झाले.

?? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ??