आज कोणाचा 19 वा वाढदिवस आहे सांगा पाहू ?

By | September 27, 2017

google 19 birthday

दचकून जाऊ नका .. तुमचा किंवा माझा कोणाचाही आज वाढदिवस नाहीये .. पण आपल्या सर्वांच्या अगदी जवळ व २४ तास संपर्कात असलेल्या एका सुविधेंचा आज १९ वा वाढदिवस आहे. २४ तास हवी ती माहिती फक्त काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहचवणाऱ्या सर्वांचा लाडक्या गुगल चा आहे १९ वा वाढदिवस आहे.

प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक दिनाचे डुडलच्या माध्यमातून महत्व सांगणा-या गुगलचा आज १९ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या डुडलमध्ये १९ आश्चर्य दाखवण्यात आले आहे.

अनेक महत्त्वाच्या घटना, महान व्यक्तींची पुण्यतिथी, जयंती या दिवशी गुगलने डुडलद्वारे त्या व्यक्तींना मानवंदना दिली, आदरांजली वाहिली. या १९ वर्षांत गुगलचे असेच लोकप्रिय ठरलेले काही डुडल्स ‘१९ सरप्राईज’मध्ये गुगल आपल्याला दाखवणार आहे .

लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली. १९९७ साली कंपनीने डोमेन रजिस्टर करत अधिकृतपणे ‘गुगल’ हे नाव ठेवलं. १९९८ साली गुगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला. गुगलला कमीत कमी वेळामध्ये जास्त चांगले रिजल्ट देणे व डुडल च्या मुळे लोकांनी डोक्यावर घेतलं . हम करे सो कायदा ह्या नियमाने गुगल कधी वागली नाही व लोकांचा गरज समजावून घेत,स्वतः मध्ये बदल करीत आजची गुगल जगातील १ नंबर चे सर्च इंजिन बनले.

ऍडसेन्स सुरु केल्यानंतर मात्र गुगलला आर्थिक तंगीचा कधीची सामना करावा लागला नाही . आजही ऑनलाईन जाहिरात क्षेत्रात गुगल ला चांगला पर्याय नाही . लोकाभिमुख सेवा काय असते हे गुगल कडून शिकावे. हळू हळू जी मेल, युट्युब आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम मुळे गुगल ग्राहकांच्या जितकी जवळ आहे तितकी दुसरी कोणतीही कंपनी नाही .

गुगल हे सर्च इंजिन नऊ भारतीय भाषांमध्ये आणि जगभरातल्या १२४ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

?? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ??